Ad will apear here
Next
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे ई – भूमीपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकराड (सातारा) : महाराष्ट्र शासनाच्या, ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ योजना आणि जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने ‘जलस्वराज्य - २’ उपक्रमांतर्गत साकारण्यात येणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील नळपाणीपुरवठा योजनेचे ई – भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.  सोमवार (१० जुलै) रोजी रेठरे बुद्रुक येथील ताराबाई मोहिते विद्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री मुंबई मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून योजनेचे भूमीपूजन करणार आहेत. 

या वेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  या कार्यक्रमात मुख्यमंत्री रेठरेवासीयांशी संवाद साधणार आहेत. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे प्रदेश चिटणीस तथा श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जि. प. सदस्या शामबाला घोडके, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, शुभांगी पाटील, सरपंच प्रविणा हिवरे, उपसरपंच हणमंत धर्मे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

रेठरे बुद्रुक गावाची लोकसंख्या १३ हजारांच्या जवळपास असून, २०३१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन जलस्वराज्य – २ प्रकल्पांतर्गत ही योजना मंजूर झाली आहे. वास्तविक २०१४ साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाच कोटी पाच लाख एस्टिमेटची पाणी योजना मंजूर झाली होती. परंतु यामध्ये अनेक जाचक अटी घालण्यात आल्या होत्या. दरम्यान, राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने योजना मंजुरीसाठी शासनदरबारी नवीन प्रस्ताव दाखल करून त्याचा पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार शासनाने सर्वेक्षण करून ही पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून आठ कोटी ५४ लाख ९७ हजार रूपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. 

१०० टक्के अनुदानातून साकारली जाणारी ही योजना जिल्ह्यातील पहिलीच योजना असून, या योजनेसाठी लोकांना कोणत्याही प्रकारची वर्गणी द्यावी लागणार नाही. विशेष बाब म्हणजे  योजनेच्या माध्यमातून लाभधारकांना सरकारतर्फे मीटरदेखील पुरविण्यात येणार असून, या योजनेच्या मंजुरीमुळे गावाला २४ तास शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.   

दरम्यान जलस्वराज्य – २ उपक्रमांतर्गत कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथेही नळपाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी, यासाठी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले प्रयत्नशील आहेत. या योजनेसाठी सुमारे सात कोटी १० लाख रूपये अपेक्षित असून, योजनेचे अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच ही योजना मार्गी लागून वडगाव हवेली ग्रामस्थांनाही स्वच्छ व शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री मुंबईत मंत्रालयात बसून थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कराड तालुक्यात एखाद्या विकासकामाचे भूमिपूजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या ई-भूमीपूजनाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPBBE
Similar Posts
राज्यात हजारांवर पाणीपुरवठा योजना राबवणार रेठरे बु. (सातारा) : प्रत्येक ग्रामस्थाला पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवण्यासाठी राज्यशासन व केंद्रशासन प्रयत्नशील असून, येत्या चार वर्षांत राज्यात तब्बल एक हजार नऊ पाणीपुरवठा योजना राबविण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  महाराष्ट्र शासनाच्या, ‘मुख्यमंत्री ग्रामीण
विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोसले यांचा नागरी सत्कार कराड (सातारा) : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मलकापूर येथील समस्त नागरिकांच्या वतीने डॉ. अतुल भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.  डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर देवस्थानचा विकास निश्चित होईल, असा विश्वास या वेळी य. मो. कृष्णा सहकारी
रेठरे बुद्रुक येथे विकासकामांचे उद्घाटन कराड : ‘भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा वरदहस्त आहे, हे मी अनेकदा अनुभवले आहे. पक्षातही त्यांचे चांगले वजन असून, असा लोकप्रतिनिधी आपल्या भागाला मिळाला तर कराड दक्षिणचा गतिमान विकास व्हायला वेळ लागणार नाही
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language